स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१८: कारला कृषी विधेयकावरुन मोठा धक्का बसला आहे. शिरोमणी अकाली दलाने लोकसभेत विधेयकाला विरोध दर्शवला होता. इतकेच नाही, तर शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांना विधेयकाविरोधात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मला गर्व आहे की, मी आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे.
यापूर्वी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आपले पद सोडणार असल्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक पास केले होते. त्यानंतर विरोधी पक्षाकडून या विधेयकाला विरोध होत आहे.
केंद्र सरकारसोबत युतीत सामील आहे अकाली दल
अकाली दल सरकारसोबत सत्ता सामील आहे. तरीदेखील त्यांच्या नेत्याने विधेयकाला विरोध दर्शवत पदाचा राजीनामा दिला. याबाबत सुखबिर सिंग बादल म्हणाले की, शेतकऱ्यांबाबत जे विधेयक पास झाले आहेत, त्यामुले पंजाब सरकारने मागील 50 वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांवर पाणी टाकल्यासारखे आहे.
अकाली दलने पक्षाच्या खासदारांना विधेयकाचा विरोध करण्यास सांगितले
यापूर्वीच, बादल यांनी चर्चेदरम्यान सांगितले होते की, या विधेयकाविरोधात पंजाबच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे. सरकारने या विधेयकाला परत घेतले पाहिजे. अकाली दलने याबाबत आपल्या खासदारांना व्हीप जारी करुन या विधेयकाचा विरोध करण्यास सांगितले होते.