
दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२१ । सातारा । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कराड येथील द फर्न रेसीडन्सी येथे एकूण 5 हजार 971 कोटी रुपयांचे 403 किलोमीटर लांबीच्या विविध रस्ते विकास कामांचा लोकार्पण व कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड येथे होणा-या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या रस्त्यांच्या सुधारणा कामांचे कोनशीला अनावरण करण्यात येणार आहे. या सर्व मार्गामुळे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी चांगली सुविधा होणार आहे.
कोनशीला अनावरण
1.कागल-सातारा या रस्त्याचे सहापदरीकरण मसूरफाटा, इंदोली, काशिळ रस्ता अपघात प्रवण क्षेत्र सुधारणा मिरज शहरांतर्गत रस्त्यांची एक वेळ सुधारणा आजरा-अंबोली संकेश्वर भागाचे उन्नतीकरण कळे-कोल्हापूर भागाचे उन्नतीकरण घाटमाथा ते हेळवाक भाग जबुतीकरण