डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या विहिरीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । खामगाव ।  केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ऐतिहासिक महत्व असलेल्या पातुर्डा येथे भेट दिली. पातुर्डा येथील आठवडी बाजारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श झालेल्या विहिरीला त्यांनी भेट दिली. भूपेंद्र यादव यांनी विहीर स्थळाची पाहणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पन करून अभिवादन केले. याठिकाणी उपस्थित नागरीक व अधिकारी यांच्याकडून गावाचे महत्व जाणून घेतले. यानंतर महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पन केले.

यानंतर सरस्वती वाचनलयाला भेट दिली. यावेळी खामगावचे  आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, विजयराव शिंदे, उपविभागीय अधिकारी श्री.  देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार श्री. वरणगावकर, गटविकास अधिकारी श्री. पाटील, सरपंच शैलजा भोंगळ,  पातुर्डा ग्रामविकास अधिकारी एस. पी. मेहेंगे, सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष उत्तमराव तायडे, तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार चांडक आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी घेतले श्रींचे दर्शन

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिराला भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने निळकंठ पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सकाळी मंदिरात पोहचून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी संस्थानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह संस्थानचे सेवाधारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!