दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २ एप्रिल रोजी बिहार येथील सासाराम येथे होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे. सासाराममध्ये शुक्रवारी झालेल्या गोंधळानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते संजय मयुख यांनी शनिवारी ही माहिती दिली. मात्र, अमित शहा यांचा पटना आणि नवादाचा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री शनिवारी संध्याकाळी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शाह सम्राट अशोकाच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहून सासाराम येथील जाहीर सभेला संबोधित करणार होते.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि आमदार संजय मयुख यांनी आज माहिती दिली. शुक्रवारी सासाराममधील गोंधळामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, २ एप्रिल रोजी नवाडा येथे त्यांची सभा होणार आहे. पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार शाह शनिवारी संध्याकाळी पटना येथे पोहोचणार आहेत.
गोंधळानंतर सासाराममध्ये तणाव
शुक्रवारी सासाराम येथे दोन गटात हाणामारी झाली. यानंतर जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. या गोंधळात अनेकजण जखमी झाले. यानंतर परिसरात इंटरनेट बंद करण्यात आले आणि कलम १४४ लागू करण्यात आले. सासाराममधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपद्रव पसरवणाऱ्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
सासाराम येथे सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांची सभा महत्त्वाची मानली जात होती. रेल्वे मैदानावरही मोठी जाहीर सभा होणार होती. त्यासाठी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र, आता शहा यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी सासाराममध्ये झालेल्या गोंधळावरून भाजपने नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्ह यांनी टीका केली. ‘सत्ताधारी पक्षांना अमित शहा यांची सासाराम भेट पचनी पडली नाही. शहा ज्या, ज्या वेळी बिहार दौऱ्यावर येतात, त्यावेळी नितीश सरकारची अस्वस्थता वाढते, असंही सिन्हा म्हणाले.