दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे फलटणच्या दौऱ्यावर असून त्यांनी फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी येथील स्वस्त धान्य दुकानास भेट देवून पाहणी केली आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार मालाचा पुरवठा केला जावा, असेही यावेळी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, आमदार राम सातपुते, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रशांत परिचारक, फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.