युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा


 

स्थैर्य, मुंबई, दि.८ नोव्हेंबर: युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)चा निव्वळ
नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमधील दुस-या तिमाहीत ५५.३ टक्के वाढीसह
५१७ कोटी रुपये झाला आहे. याच चालू वर्षातील एप्रिल ते जूनमधील पहिल्या तिमाहीत बँकेला
३३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर गेले वित्त वर्ष २०१९-२०च्या दुस-या तिमाहीत
बँकेला १,१९४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. 

बँकेने संचालक मंडळाच्या
बैठकीनंतर देण्यात आलेल्या आर्थिक लेखाजोखामध्ये सांगितले की बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न
चालू वित्त वर्षाच्या दुस-या तिमाहीत ६.१ टक्क्यांनी वाढून ६२९३ कोटी रुपये झाले आहे
जे एक वर्षापूर्वी २०१९-२०च्या दुस-या तिमाहीत ५,९३४ कोटी रुपये होते. बँकेचे अन्य
उत्पन्न याच कालावधीत २३०८ कोटी रुपये राहिले आहे जे गत आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत
११४३ कोटी रुपये होते. बँकेचा एनपीए चालू वित्त वर्ष जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या एकूण
कर्जाच्या १४.७१ टक्के राहिला जो एक वर्षांपूर्वी २०१९-२० च्या तिमाहीत १५.७५ टक्के
होता. बँकेचा निव्वळ एनपीए किंवा बुडीत कर्जात तिमाहीत घट होऊन ४.१३ टक्क्यांवर आले
जे गतवर्षी सामान कालावधीत ६.४० टक्के होते.   


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!