पळशी गावच्या हद्दीतील दहाबिगा शिवारातून अज्ञात चोरट्यांनी केला वीस हजार रुपये किंमतीचा वीस क्विंटल कांदा लंपास


 

स्थैर्य, खंडाळा, दि.२९: याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,पळशी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये दहाबिगा नावाच्या शिवारात विठ्ठल भरगुडे हे सोमवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता शेतामधील पञ्याच्या शेडमध्ये गेले असता त्याठिकाणी शेतामधून काढलेला तब्बल वीस हजार रुपये किंमतीचा कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद विठ्ठल भरगुडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!