
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अशोक गस्ती यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ५५ वर्षीय अशोक गस्ती यांची प्रकृती बिघडल्याने मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मनिष राय यांनी गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अशोक गस्ती यांचं निधन झालं असल्याची माहिती दिली. दरम्यान भाजपा नेत्यांच्या ट्विटमुळे अशोक गस्ती यांच्या निधनावरुन काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, “अशोक गस्ती यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं”.