मास्टर कृष्णराव यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अविस्मरणीय अभिवादन मैफल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । सातारा । आधुनिक नाट्य संगीताचे जनक व प्रतिभावंत गायक व संगीतकार मास्टर कृष्णराव यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टने आयोजित केलेली नाट्य व सुगम संगीताची मैफल संगीत रसिकांना आगळा वेगळा आनंद देणारी अशी झाली. या मैफिलीचा अस्वाद अनेक संगित प्रेमिंनी घेतला.
राजेंद्र मणेरीकर यांनी प्रारंभी मा कृष्णराव यांचा बालपण ते  तरुणपणा असा सांगीतिक प्रवास थोडक्यात सागितला.त्यानंतर ज्येष्ठ गायक पं हेमंत पेंडसे यांनी’  देवा धरले चरण ‘ या गीताच्या दमदार गायनाने रंग भरला. यानंतर मास्टरानी संगीतबद्ध केलेली ‘विराट ज्ञानी ‘, ‘ नुरले मानस ‘ , ही  गीते मणेरीकर व तेजस मिस्त्री यांनी रंगवली.
चीजेवरून नाटकातील पदे होत असत पण कृष्णराव यांच्या संगीत कौशल्याने पदावरून चीजा कशा होऊ लागल्या याचा प्रत्यत देणारी ‘ मन मे मोहन ‘ ही चीज हेमंत पेंडसे यांनी अप्रतिम खुलवली.सातारयातील युवा गायक यश कोल्हापुरे याने ‘ भाव तो ची देव ‘ हे मास्तरांनी स्वरबद्ध केलेले भजन गाऊन वाहवा मिळवली. आणि उत्तरोत्तर ती मैफल रंगतच गेली . गीतांच्या दरम्यान राजेंद्र मणेरीकर यांचे मास्तरांच्या जीवनाचा आणि सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणारे, त्यांची गुण वैशिष्ट्ये विशद करणाऱ्या खुसखुशीत निवेदनाने ती मैफल संगीताचा आनंद आणि ज्ञान यांच्या एका वेगळ्याच उंचीवर गेली आणि ” का रे ऐसी माया ‘ या भैरवी नंतर रसिकांना हुरहूर लाऊन गेली..
स्वानंद कुलकर्णी यांची संवादिनीची आणि सचिन राजोपाध्ये यांची तबल्याची साथसंगत प्रत्येक गाणे खुलवणारी  होती. सुभाष कुंभार यांची ध्वनीव्यवस्था उत्तम होती.
प्रारंभी गोडबोले ट्रस्ट तर्फे अरुण गोडबोले यांनी प्रास्ताविक केले तर कलाकारांचे स्वागत अशोक व, डॉ अच्युत व प्रद्युम्न गोडबोले , प्रा. पुरुषोत्तम शेठ, प्रा.अविनाश लेवे यांनी केले. या अभिवादन मैफिलींसाठी मा.कृष्णराव यांची नात प्रिया फुलंब्रीकर पुण्याहून मुद्दाम आल्या होत्या. त्यांचाही स्वागत सत्कार करण्यात आला.
समर्थ सदन मध्ये कोरोनामुळे अनेक दिवसांनी असा कार्यक्रम झाला. त्यासाठी गोडबोले कुटुंबीय, श्रीराम कुलकर्णी, पाध्ये, संगीता व सतीश कोल्हापुरे, अनुपमा व अंजली गोडबोले , मास्टर दत्ता काळे, मिलिंद हळबे,वर्षा जोशी ,डॉ आमोद पेंढारकर, गौतम भोसले, स भ शेंबेकर बुवा, डॉ शाम बडवे यांचेसह संगीतप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.

Back to top button
Don`t copy text!