नागठाणे सोसायटीवर अजिंक्य पैनेलचे पुन्हा निर्विवाद वर्चस्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागठाणे येथील विकास सेवा सोसायटी नं.१ वर अजिंक्य ग्रामविकास पैनेलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व मिळविले.त्यांनी विरोधी नागठाणे ग्रामविकास पैनेलचा १३ विरुद्ध ० असा धुव्वा उडविला.या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पैनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

नागठाणे विकास सेवा सोसायटी नं.१ ची यंदाची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीची झाली.निवडणूक लागल्यानंतर या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पैनेलला पारंपारिक चौंडेश्वरी ग्रामविकास पैनेल बरोबरच माजी सरपंच विष्णू साळुंखे-पाटील यांच्या नागठाणे ग्रामविकास पैनेल असा मुकाबला होणार अशी अटकळ येथील ग्रामस्थांनी बांधली होती.मात्र ऐन वेळी चौंडेश्वरी ग्रामविकास पैनेलने निवडणुकीतुन माघार घेतली.यामुळे अजिंक्य पैनेलची लढत नवीनच उदयास आलेल्या नागठाणे ग्रामविकास पैनेलबरोबर झाली.
या निवडणुकीत ९१९ सभासदांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.यावेळी झालेल्या मतमोजणीत अजिंक्य ग्रामविकास पैनेलने विरोधी नागठाणे ग्रामविकास पैनेलाला पराभवाची धूळ चारत आपले सर्व १३ उमेदवार विजयी केले.अजिंक्य पैनेलचे प्रकाश गोरखनाथ नलवडे, गौरव नारायण साळुंखे, दादासो जगन्नाथ साळुंखे, दिलीप आण्णा साळुंखे, निलेश यशवंत साळुंखे,सचिन आनंदराव साळुंखे,सचिन युवराज साळुंखे, हिंदुराव आण्णा साळुंखे, सौ.राजश्री अनिल मोहिते,सौ.संगीता सुनिल साळुंखे,मोहन बाबुराव राजे,शंकर धोंडी चक्के,दत्तात्रेय रघुनाथ मोहिते हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

सर्व विजयी उमेदवारांचेसहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा.श्रीनिवास पाटील,आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,पी.डी.पाटील सहकारी बैंकेचे संचालक सागरदादा पाटील,माजी जि.प.सदस्य यशवंत साळुंखे,सौ.सुवर्णाताई साळुंखे, माजी.पं. स.सदस्य बाळकृष्ण साळुंखे,सरपंच सौ.रुपाली बेंद्रे,उपसरपंच अनिल साळुंखे, माजी चेअरमन संजय साळुंखे,अजित साळुंखे(सर)कृषिभूषण मनोहर साळुंखे,मारुती जेधे यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!