
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत अतित ता.जि.सातारा येथे ग्रामपंचायतीचे ध्वज विक्री केंद्रामार्फत ग्रामस्थांना ध्वजाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बेबीताई जाधव, तानाजी जाधव, दादा यादव, माजी सैनिक संघटनेचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गट विकास अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी ,”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “स्वराज्य महोत्सव”उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.