दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि.९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रम देशभरात आयोजित केले जाणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांनी फलटण येथे शनिवार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमामध्ये संपूर्ण शहरभर प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य मा. श्री बाबासाहेब गंगवणे सरांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली म्हणून केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्याचे आवहान केले यात प्रशासनाने 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत भारतभर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे ही एक आनंदाची बाब आहे मात्र हे करताना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता सर्व विद्यार्थी व पालकांनी घेतली पाहिजे अशी सूचना दिल्या व मुलांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त शुभेच्छा दिल्या.
यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देशभक्तीपर गीते व पथनाटय सादर केले शालेय विदयार्थ्यानी विविधतेतून एकता पोषाखा च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले . तसेच भारत मातेच्या घोषणा देत प्रभात फेरीस सुरवात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथून रविवार पेठ मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक , भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबेडकर चौक , स्तंभ चौक , महात्मा जोतीराव फुले चौक , माळजाई मंदिर , श्रीमंत मालोजीराजे पुतळा, अधिकार गृह , सफाई कामगार कॉलनी येथून गजानन चौकातून उमाजी नाईक चौकातुन प्रशालेत प्रभात फेरी ची सांगता झाली .
यावेळी माझा तिरंगा माझा अभिमान हर घर तिरंगा घर घर तिरंगा , भारत माता की जय , अशा अनेक घोषणा यावेळी विद्यार्थांनी दिल्या जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृति तेवत राहाव्यात व देशभक्तीची भावना कायम स्वरुपी मनात राहावी या उद्देशाने फलटण ऐज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल च्या स्काऊट गाईड व राष्ट्रीय कॅडेट कोरच्या विद्यार्थांनी या फेरीत सहभाग घेऊन एक वेगळा ठसा उमटवला व त्यांनी विविध घोषणा देत यावेळी भारत मातेची प्रतिज्ञा ही सादर केली .