वृक्षसंगोपनाच्या बिहार पॅटर्नला सुरुवात
स्थैर्य, वावरहिरे, दि. १९ : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश व वृक्षलागवड व संवर्धन या कडे होत असलेलं दुर्लक्ष या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, दिवसेंदिवस होणारी उष्णतावाढ अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. त्यावर यशस्वी मात करण्यासाठी सरकारने त्यावर उत्तम पर्याय शोधला. तो म्हणजे “बिहार पॅटर्नचा”.
या पॅटर्न नुसार झाडे लावण्याबरोबरच त्याचे संगोपन व संरक्षण करण्या सदंर्भात सरकार ग्रामपंचायतीला थेट निधी देवु लागले. या योजने अतंर्गतच ग्रामपंचायत मार्फत वावरहिरे ते जाधववाडा व वावरहिरे ते बल्लाळवाडी या दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा पाचशे झाडाचे वृक्षारोपण ग्रामसेवक ए .टी. गंबरे यांच्या हस्ते करुन या योजनेला सुरुवात झाली. वृक्षलागवड केल्यानंतर या रोपांच्या संगोपनासाठी मनरेगा योजने अंतर्गत बिहार पॅटर्न लागु होणार असुन त्यामुळे व्यवस्थित संगोपन झाल्यास गावातील मजुरांना पुढील तीन वर्षे रोजगार उपलब्ध होणार आहे. वृक्षारोपणावेळी वनरक्षक भोसले, माजी कक्ष अधिकारी तानाजी भोसले, विश्वासराव पांढरे, कैलास निलाखे, उमाजी चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.