स्टडी ग्रुपद्वारे यूके क्वारंटाइन फंडची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । मुंबई । विस्तृत आणि समग्र रोजगाराच्या सुविधेचा भाग म्हणून प्रमुख इंटरनॅशनल एज्युकेशन प्रोव्हायडर स्टडी ग्रुपने सप्टेंबरपासून यूकेमध्ये शिक्षण आणि कामात मदतीकरिता एक नवा क्वारंटाइन सपोर्ट फंड तयार केला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना २०२१/२२ या शैक्षणिक वर्षात यूके हायर एज्युकेशन पाथवे प्रोग्रामपर्यंत पोहोचण्यात मदतीकरिता स्टडी ग्रुप, यूके येथील सध्याच्या ट्रॅव्हल ‘रेड लिस्ट’ मधील देशांतील पात्र विद्यार्थ्यांना मॅनेज्ड क्वारंटाइन हॉटेलच्या खर्चात मदतीकरिता £१,००० उपलब्ध करून देईल. अनेक भारतीय विद्यार्थी पुढील काही आठवड्यांमध्ये आपला निर्णय घेणार असून विदेशात शिक्षण घेण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरु होणाऱ्या प्रोग्राममसाठी १६ जुलैपर्यंत आपली जागा निश्चित करतात, त्यांच्यासाठी हा फंड उपलब्ध आहे.

स्टडी ग्रुपचे सर्व यूके इंटरनॅशनल स्टडी सेंटर्स (आयएससी) मध्ये शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी यूके क्वारंटाइन सपोर्ट फंड उपलब्ध आहे. यात किग्सन युनिव्हर्सिटी आयएससी, टीसाइड युनिव्हर्सिटी आयएससी, हडर्सफील्ड विद्यापीठ आयएससी आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी लंडन आयएससी यांचा समावेश आहे.

स्टडी ग्रुपचे सीईओ एम्मा लँकेस्टर म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चच्या निष्कर्षानंतर स्टडी ग्रुपचा यूके क्वारंटाइन सपोर्ट फंड तयार करण्यात आला आहे. यातून असे दिसून आले की, आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाची संधी शोधणारे विद्यार्थी शैक्षणिक योजना रद्द करण्याऐवजी क्वारंटाइन राहण्यास पसंती देतील. कारण जागतिक परफॉर्मन्स मिळवण्यासाठी त्यांना ऑन-कँपस स्टडीचा अनुभव हवा आहे. यामुळे त्यांच्या भविष्यातील नोकरीच्या शक्यता वाढतात. एक नवा क्वारंटाइन सपोर्ट फंड लाँच करून आम्ही युकेमधील क्वारंटाइन गरजांमधील वित्तीय प्रभाव कमी करत सध्या यूकेतील ट्रॅव्हल ‘रेड लिस्ट’ मध्ये समाविष्य देशांतील विद्यार्थ्यांसाठी सक्रियतेने अतिरिक्त मदत प्रदान करत आहोत. स्टडी ग्रुपच्या व्यापक रोजगार संधींना याद्वारे अधिक मजबुती मिळेल. यूकेमध्ये अधिक यशस्वीतेने शिक्षण आणि कामात मदतीकरिता हा फंड तयार करण्यात आला आहे. तसेच उच्च शिक्षण आणि पोस्ट ग्रॅज्युएशन रोजगारात त्यांना प्रगतीची सुविधा प्रदान केली जाते.”

स्टडी ग्रुपच्या रोजगार पात्रता सुविधांत ‘ प्रिपेअर फॉर सक्सेस’, ‘जॉब रेडी’ आणि ‘व्हर्चुअल इंटर्नशिप’ यांचा समावेश आहे. हा नवा धोरणात्मक उपक्रम शिक्षणार्थींना यूकेतील विद्यापीठांमध्ये कोणत्याही अ़डचणीशिवाय प्रगती करणे आणि २१ व्या शतकात कामाच्या ठिकाणी अधिक यशस्वी होण्यासाठी आवश्यक प्रमुख रोजगार कौशल्य मिळवण्यात सक्षम होण्याकरिता तयार करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!