उद्यानकन्या मठाचीवाडीमध्ये दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 07 जानेवारी 2023 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी मठाचीवाडी ता. फलटण येथे दाखल झाल्या असून मठाचीवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. जयश्री भोसले, उपसरपंच काकासो कदम, विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी भोसले, ग्रामसेवक श्री. ढोबळे व ग्रामस्थांनी या उद्यानकन्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे 20 आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेल्या या विद्यार्थीनी मठाचीवाडी गावातील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावांमध्ये शेतीविषयक विविध उपक्रम कार्यक्रम राबविणार आहेत. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविद्या कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत.

महाविद्यालयाच्या उद्यानकन्या स्नेहल निकम, प्रज्ञा देशमुख, नम्रता ढोपरे, वैभवी रणवरे, गायत्री शेडगे, अस्मिता शिंदे या उद्यानकन्या मठाचीवाडी येथे दाखल आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले.

या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर आणि मार्गदर्शक शिक्षक प्रा.ए.डी.पाटील व प्रा. जे.व्ही.लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली या उद्यानकन्या मठाचीवाडी येथे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!