दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्री चा उंबरठा ओलांडला नाही ते उध्दव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकट काळातील शेतकऱ्यांना किती मदत केली याचा हिशोब द्यावा अशी सणसणीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहे आणि तो ठाकरेंच्या ढोंगीपणाला बळी पडणार नाही असा विश्वास गोरे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
यासंदर्भात जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना घर कोंबडा मुख्यमंत्री अशी पदवी जनतेने दिली होती . ठाकरेंनी शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टी गारपीट यासारख्या संकटांना तोंड द्यावे लागलेले असताना अजिबात मदतीचा हात पुढे केला नाही ठाकरेंनी एकदाही शेतकऱ्यांची भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नाही मात्र मुख्यमंत्री असताना विदेशी दारूवरील कर 300 टक्क्यावरून 150 टक्क्यावर आणण्यातच त्यांनी धन्यता मांडली.
सत्तेवर येण्यापूर्वी याच उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीचा फटका बसलेले शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली होती सत्तेवर आल्यानंतर ठाकरेंच्या सरकारने शेतकऱ्यांना दमडीही दिली नाही आणि आता हेच ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत आहेत तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा हिशोब द्या आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जा असाही टोला गोरे यांनी लगावला आहे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली मात्र ही घोषणा कागदावरच राहिली त्यावेळी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांना आपल्या सरकारच्या वतीने काही द्यावेसे वाटले नाही शिंदे फडणवीस सरकार नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा करणे सुरू केले आहे महाराष्ट्राचे शेतकरी हे सुबुद्ध आहेत त्यांना खरे काय आणि खोटे काय हे चांगले कळते त्यामुळे ज्यांनी मदतीची केवळ आश्वासने दिली त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काय दिले याचाही त्यांनी विचार करावा अशीही टीका गोरे यांनी केली आहे.