कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला दहा कोटीचा निधी देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । कराड । कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रूपये आणि इनोवेशन (innovation) केंद्रासाठी 5 कोटी रूपये असे एकूण 10 कोटी रुपये देणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडेशन कौंन्सिल) यांचेकडून  ‘नॅक ए प्लस’ मानांकन मिळाले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. बुराडे, नॅक समन्वयक प्रा. मनोज सरडे, प्र. प्रबंधक दिलीप कांबळे यांचा यथोचित सत्कार आज मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव उपस्थित होते. मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

मंत्री उदय सामंत म्हणाले, कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रवेशासाठीच्या 100 टक्के सर्व जागा भरल्या आहेत. एमफार्मसीसाठी 30 जागा भरल्या जाणार आहेत. याबाबत शासनाकडे मागणी केली असून येत्या काही दिवसांमध्ये या जागा वाढवण्यात येणार आहेत. दरम्यान, पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम ठरवण्याची समितीतील एक क्रमांकाचे व 8 क्रमांकाचे मानांकन या कॉलेजच्या विद्यार्थ्यांस मिळाले आहे. तर पुढच्या 50 मधील आठ विद्यार्थी कराडच्या औषधनिर्माणशास्त्र  कॉलेजचे आहेत. ही अभिमानाची बाब आहे, असेही कौतुक मंत्री उदय सामंत यांनी केले.

यंदा या महाविद्यालयात 100 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या मुलींना राहण्यासाठी वसतीगृह कमी पडत आहे. त्यामुळे 50 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यासाठी 5 कोटी  रूपये तातडीने मंजूर केले आहेत तर महाविद्यालयात प्रयोगशाळेसाठी 5 कोटी असे 10 कोटी रूपये मंजूर केले आहेत. तसेच एमफार्मसीसाठी एकूण 30 जागा येत्या काही दिवसांमध्ये वाढवणार आहे.

कराडच्या शासकीय औैषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा देशभरात चांगला नावलौकीक आहे.  त्यामुळे ही संस्था अपडेट करण्यासाठी जे काही करावे लागेल त्यासाठीचे सहकार्य शासन करेल,  अशी ग्वाही यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!