सातारा “मास’च्या अध्यक्षपदी उदय देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 18 : मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ सातारा या उद्योजकांच्या संघटनेच्या (मास) अध्यक्षपदी उदय देशमुख यांची निवड करण्यात आली. ‘मास’च्या संचालक मंडळाच्या सभेत 2020 ते 2022 या कालावधीसाठी या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. उपाध्यक्षपदी राजेंद्र मोहिते यांची फेरनिवड करण्यात आली असून सचिवपदी धैर्यशील भोसले यांची निवड झाली आहे.

औद्योगिक वसाहतीतील उद्योगधंद्यांना चालना देणे, अडीअडचणी सोडवण्यासाठी ‘मास’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात. ‘मास’ची संचालक मंडळाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात होऊन पदाधिकारी निवडी बिनविरोध करण्यात आल्या.

खजिनदारपदी भरत शेठ, सहसचिवपदी दीपक पाटील व सागर कलानी यांची निवड करण्यात आल्याची माहिती मास निवडणूक समितीचे अध्यक्ष वसंत फडतरे यांनी दिली. या निवड समितीत वसंत फडतरे, सुनील व्यवहारे, दिलीप उतकूर, राजेश कोरपे, सुरिंदर अंबरदार यांनी काम पाहिले. मावळते अध्यक्ष सुरिंदर अंबरदार यांच्या काळात झालेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. उद्योजकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय देशमुख आणि उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी यावेळी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!