आयपीएल 2020 : आयपीएल यजमानपदासाठी यूएई झाले सज्ज, झगमगाटाने दुबई सजली; टीम इंडिया प्रथमच या मैदानावर खेळणार


 

स्थैर्य, दि.१७: आयपीएलच्या यजमानासाठी अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम सज्ज झाले आहे. याच मैदानावर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान सलामी सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर येथे १९ लीग सामने होतील. अंदाजे १०० काेटींचे असलेल्या स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००६ ला भारत व पाक यांच्यात झाला हाेता. आता कोरोनामुळे चाहत्यांना सध्या बंदी आहे. आयपीएल २०१४ मध्ये येथे ७ सामने खेळवण्यात आले.

येथे आतापर्यंत १३ कसोटी, ४६ वनडे, ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले. भारताने एकही टी-२० सामना खेळला नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!