दहिवडी जवळील अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू


स्थैर्य, सातारा, दि.28 ऑक्टोबर : माण तालुक्यातील दहिवडी कडे निघालेल्या खटाव तालुक्यातील बोथे आणि राजापूर येथील दोन तरुणांना आज सायंकाळी सहाचे सुमारास रस्त्यावर दुचाकी घसरून ती झाडावर जाऊन आढळल्याने आपला जीव गमवावा लागला.
राजापूर येथील आकाश सुरेश लवंघारे आणि बोथे गावचे चैतन्य दादा चव्हाण हे दुचाकीवरून दहिवडी कडे चालले असताना आंधळी पुलाजवळ ,पेट्रोल पंपाजवळ मोटार सायकल रस्त्यावरून घसरून झाडावर जाऊन जोराची आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला आणि या दोघांचाही जागीच अंत झाला.

अपघाताची बातमी दहिवडी पोलीस ठाण्यात कळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तराडे आणि हवालदार गाढवे यांचे सह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली तसेच या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दहिवडी शासकीय रुग्णालयात आणले. या अपघातचा अधिक तपास दहिवडी पोलीस ठाणे करत असून या अपघातामुळे बोथे आणि राजापूर गावावर शोक कळा पसरली आहे.


Back to top button
Don`t copy text!