फलटण शहरात दुचाकी वाहनांची तपासणी; १,५२,१०० रुपयांचा दंड जमा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
गेल्या काही महिन्यात फलटण शहर हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार मोटारसायकलचा वापर करतात आणि काही गुन्ह्यांमध्ये मोटारसायकलची नंबरप्लेट नीट नसते, असे निदर्शनास आल्याने अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच वाहनधारकांना वाहतुकीची शिस्त लागावी व अपघात होण्यास आळा घालण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा नाकाबंदी आयोजित केली होती. तरीही फलटण शहरात असलेले वाहनांना, विशेषतः दुचाकी वाहनांना नंबरप्लेट योग्य रीतीची नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षा अभियान सुरू असल्याने आज फलटण शहरात मुधोजी हायस्कूल, कोळकी चौक, मुधोजी कॉलेज, आरटीओ ऑफिससमोर, स्तंभ चौक व महात्मा फुले चौक येथे दुचाकी वाहन तपासणी करण्यात आली.

यावेळी नंबर प्लेटविषयी अपराधच्या १११ केसेस आणि दंड ६०,००० /- रुपये आणि इतर ११८ केसेस दंड ९२,१०० /- रुपये असे ऐकून २२९ केसेसमध्ये एकूण दंड १,५२,१००/- रुपये आकारण्यात आला.

यावेळी वाहनांना नियमाप्रमाणे नंबरप्लेट बसवाव्यात यासाठी खालील नमूद २,००० माहितीपत्रके वाहनधारक यांना वाटण्यात आली.

या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, विजयमाला गाजरे, सहा. फौजदार व पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता.


Back to top button
Don`t copy text!