

स्थैर्य, सातारा, दि. 2 : सदर बझार येथील अजिंक्यतारा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली काळ्या रंगाची हिरोहोंडा चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, प्रेमजित राजेंद्र कणसे रा. तळीये, ता. कोरेगाव यांनी सदरबझार येथील अजिंक्यतारा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन मोटारसायकल पार्क करून केली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीचा वापर करून ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

