दीडवाघवाडी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । माण । म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी ता. माण येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. बापू बाबा पुकळे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सकाळच्या सुमारास बापू बाबा पुकळे हे दुचाकीने विरकरवाडीवरुन पुकळेवाडीकडे निघाले होते. दरम्यान, कार कळंबा ता. चालक सुमित बाळासाहेब पाटोळे (रा. भैरवनाथ पार्क करवीर जि. कोल्हापूर) (एमएच ०५ सीए १७१८) हे कारने मायणीवरुन म्हसवडच्या दिशेने येत होते. यावेळी दुचाकी व कारची व समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेमध्ये दुचाकी चालक बापू पुकळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रोशन उत्तम पुकळे (दोघे रा. पुकळेवाडी ता.माण) हे गंभीर जखमी झाले. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात प्रविण मच्छिंद्र हुबाले यांनी दिली. म्हसवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

धोकादायक चढ काढून रस्ता सपाट करणे गरजेचे
म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी हद्दीत म्हसवड वरुन वडजलकडे जाताना राक्षस रुपी असलेल्या चढामुळे समोरुन वाहन आलेले दिसत नसल्याने या अपघात स्थळावर महिन्याला तिन चार अपघात होत असतात आज पर्यंत या ठिकाणी १० ते १२ जनांना या राक्षसी रुपी चढाने आपल्या बरोबर नेमले अनेक वेळा बांधकाम विभागाकडे अपघात क्षेत्र म्हणून फलक अथवा स्पिडब्रेकर करण्याची मागणी करुन रस्त्यावरील चढ काढून रस्ता सपाट करण्याची मागणी करण्यात येवून हि बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे आजुन किती जनांचा जिव घेतल्यावर बाधकाम विभागाला जाग येणार असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!