दैनिक स्थैर्य | दि. ४ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
श्रीराम कारखान्याच्या पेट्रोलपंपासमोर डांबरी रस्त्याच्या बाजूला कच्च्या रस्त्यावर फलटण येथे ३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फलटणहून विडणीकडे जात असताना शेषराम रामप्रसाद लोध (वय २३ वर्षे, सर्व मूळ रा. सकरोन पकडी, ता. रमापुर, जि. रूपनदेही, देश नेपाळ, सध्या रा. विडणी (अब्दागिरेवाडी), ता. फलटण, जि. सातारा) याने मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल (नं.एमएच११बीबी२८२) चालवून श्रीराम कारखान्याच्या पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच११सीक्यू७२८०) ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शेषराम लोध हा गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले कालेसरन लोध व सुरेंद्र हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि नितीन नम करत आहेत.