स्थैर्य, सातारा, दि. २५: जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवणार्या सातार्यातील दोन व्यापार्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाळासो पवार वय 27 वर्षे रा. यवतेश्वर ता. जि. सातारा आणि संतोष किसन जाधव वय -45 वर्षे रा अंबवडे, ता. सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, दि 18 रोजी शाहूपुरी पोलिस पेट्रोलिंग करत होते. यावेळी 12च्या सुमारास पेट्रोलिंग असताना कस्तुरबा गांधी प्राथनिक केंद्र सोमवार पेठ सातारा येथे गेलो असता केंद्राजवळील पंचपाळी हौदाजवळील चैतन्य अपार्टमेंटमधील गाळा क्र. 1 निलम मसाला अॅण्ड ड्रायफुड्स हे दुकान 11 वाजून गेले तरी दुकान मालक राहुल बाळासो पवार वय 27 वर्षे रा. यवतेश्वर, ता. जि. सातारा यांनी सुरूच ठेवल्याचे आढळून आले.
तसेच त्याच अपार्टमेंटमधील गाळा क्रमांक 4 येथील एशियन पेंन्ट्स कलर वल्ड नावाचे दुकान सुरू ठेवलेले दिसून आले. दुकान मालक यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी संतोष किसन जाधव वय 45 वर्षे रा अंबवडे, ता. सातारा सांगितले तर दुकानामध्ये कलर घेणेसाठी सुशील रामचंद्र गायकवाड रा. 145 व्यंकटपुरापेठ सातारा उपस्थित होते.
दोन्ही दुकान मालक यांना अत्यावश्यक सेवेतील आस्थापनासाठी सकाळी 07.00 ते सकाळी 11.00 वा पर्यंत अशी मर्यादीत वेळ दिलेली असतानाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र कोविड 19 अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.