
स्थैर्य, 20 मार्च, सातारा : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातून एकूण १९ हजार ७८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे दोन हजार २०३ तडजोडीने निकाली निघून एकूण २५ कोटी ७० लाख ३७ हजार ६२० रुपयांची वसुली करण्यात आली, तसेच वादपूर्व १३ हजार ८४८ प्रकरणामधील दोन हजार २२६ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यामध्ये दोन कोटी ६० लाख ३४ हजार ८६२ एवढी रक्कम वसूल करण्यात आली.
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुखजिल्हा न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या हस्ते झाले. या वेळी पॅनेल प्रमुख ए. एम. शेटे, व्यायिक अधिकारी व सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
लोकअदालतीमध्ये एकूण चार हजार ४२९ प्रकरणे निकाली निघाली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत, कर वसुली या प्रकरणांचा समावेश होता.
या अदालतीत एकूण नऊ आणि तालुका न्यायालयात एकूण २८ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल पाणीपट्टी मालमत्ताप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनेलवर एक विधिज्ञ पॅनेल सदस्य म्हणून काम पाहात होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरिता पक्षकार, विधिज्ञ, सर्व व्यायिक अधिकारी, पोलिस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोक अदालतीला बांगला प्रतिसाद मिळाला असून, भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश निना बेदरकर यांनी सांगितले.
