
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली प्रतिक विजय साठे वय 28 राहणार बुधवार पेठ कराड व बजरंग उर्फ बजा सुरेश माने वय 27 राहणार बुधवार पेठ कराड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याचे कडक धोरण ठेवले आहे शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत आहे अशा गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून त्यांना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना प्राप्त होत्या . दिनांक 10 जून रोजी धुमाळ यांना आपल्या गोपनीय बातमीदार मार्फत सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेला साठे व माने हा गुन्हेगार एसटी स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली . त्यांनी आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या पथकाने एसटी स्टँड परिसरात सापळा लावून प्रतीक साठे व बजा माने या दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक सातारा यांची सातारा जिल्हा देण्याची परवानगी आहे काय याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे ती परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले या दोन्ही गुन्हेगारांना 10 जून रोजी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेऊन त्यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या कारवाईत पोलिस हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, मयूर देशमुख मोहसीन मोमिन प्रवीण पवार केतन शिंदे गणेश कचरे यांनी कारवाईत भाग घेतला.