
दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योती किरण कदम वय २७, रा. मालगाव, ता. सातारा या महिलेने दि.३१ जुलै रोजी नऊ वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी तुळईच्या लाकडाला साडी किंवा पडद्यासारख्या कपड्याने गळफास लावून घेतल्याची खबर किरण प्रकाश कदम यांनी सातारा तालुका पोलिसांना दिली. दुसऱ्या घटनेत दि.३१ जुलै रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास संतोष एकनाथ यादव, वय ४३, रा. धावडवाडी, तालुका खंडाळा याने दोरीने गळफास लावून घेतल्याची खबर संजय विठ्ठल यादव यांनी खंडाळा पोलिसांनी दिली.