दोन अट्टल दुचाकी चोर जेरबंद; एलसीबीची कारवाई : सहा मोटासायकली हस्तगत


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: सातारा शहरात चोरीच्या मोटारसायकली विकण्यास आलेल्या दोघांना सातारा एलसीबीच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1 लाख 10 हजारांच्या सहा मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर व बसस्थानक परिसरात तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोर्‍यांचे प्रमाण वाढल होते. त्यामुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोर्‍यांचा छडा लावण्यासाठी यंत्रणा गतिमान केली. एलसीबीच्या पथकांचे पेट्रोलिंग सुरू होते. दरम्यान, दोन दुचाकीचोर चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी सातारा शहरात येणार आहेत, असल्याची खात्रीशार माहिती मिळाली. 

त्यामुळे पथकाने सापळा लावून दोन्ही संशयीतास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी सातारा बसस्थानकाचे पार्किंग, उंब्रज, काशीळ येथून एकुण 6 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या दुचाकींबाबत सातारा शहर, उंब्रज व बोरगाव हद्दीतील चोरीस गेलेल्या माटरसायकल मालक यांनी फिर्याद दाखल केली नसल्याने त्यांना संपर्क करून संबधीत पोलीस ठाणेस तक्रार दाखल करणची प्रक्रिया सुरू आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, मुबीन मुलाणी, पो. ना. शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, विशाल पवार व चालक विजय सावंत यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!