
स्थैर्य, सांगली, दि.२७: लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात असलेल्या कोविड सेंटरमधून दोन कैद्यांनी पलायन केले. राजू कोळी आणि रोहित जगदाळे (दोघेही रा. काळी वाट, हरिपूर) असे त्यांची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात या दोघांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यांना कोठडीत ठेवताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात दोघांना ही कोरोना निदान झाले होते. त्यामुळे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात असलेल्या कैद्यांसाठी सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास गणती सुरू असतानाच त्यांनी पलायन केले. हा प्रकार समजताच पोलिसांनी नाकेबंदी करत त्यांचा शोध सुरू केला आहे.