सातारा शहर व परिसरातून दोन जण बेपत्ता


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहर व परिसरातून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन रमेश भणगे वय 40, रा. धनकवडी, पुणे याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना तो दि. 29 जुलै रोजी 11 ते 4 वाजण्याच्या दरम्यान कोणास काही एक न सांगता रुग्णालयातून निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नसल्याची खबर सौ. आशा रमेश भणगे, रा. मोरे कॉलनी सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

दुसर्‍या घटनेत दि. 17 ऑगस्ट रोजी 7.45 वाजण्याच्या सुमारास दत्तनगर, कोडोली, ता. सातारा येथुन सचिन जालिंदर कदम रा. चंचळी, ता. कोरेगाव हा बेपत्ता झाल्याची खबर जालिंदर जगन्नाथ कदम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!