एका कारची धडक तर मागून येणार्‍या कारने चिरडलेशिरवळजवळ अपघातात दुचाकीवरील दोघे ठार


 

स्थैर्य, खंडाळा, दि.२२: खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये महामार्गावर कारने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये मोटारसायकलीवरील दोघांचा मुत्यू झाला आहे. यामध्ये प्रकाश लक्ष्मण लोंबर (वय 60 मूळ रा. बोपर्डी, पुणे), विठ्ठल धर्माजी पिसे (वय 58, रा. पिसेवाडी, ता. आटपाडी जि. सांगली दोघे, रा. सध्या शिरवळ, ता. खंडाळा) असे मोटारसायकलवरील ठार झालेल्या दोघांचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये प्रकाश लक्ष्मण लोंबर (वय 60 मूळ रा. बोपर्डी, पुणे), विठ्ठल धर्माजी पिसे (वय 58,रा. पिसेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली दोघे रा. सध्या शिरवळ ता. खंडाळा) हे दोघे मोटारसायकलवरून (क्र.एमएच-45-जी-5964) वरून महामार्ग ओलांडत होते. यादरम्यान, सातारा बाजूकडून आलेल्या भरधाव वेगाने अज्ञात कारचा जोरदार धक्का मोटारसायकलला बसला. यावेळी कारचा धक्का लागताच दुचाकीवरील प्रकाश लोंबर व विठ्ठल पिसे हे दोघे महामार्गावर पडल्यानंतर धक्का दिलेल्या कारच्या मागे भरधाव वेगाने असणारी दुसरी कार (क्र.एमएच-02-जेपी-1727) मोटारसायकलवरून पडलेल्या प्रकाश लोंबर व विठ्ठल पिसे या दोघांच्या अंगावरून गेल्याने प्रकाश लोंबर व विठ्ठल पिसेहे दोघे गंभीर जखमी होत जागीच मृत्यू झाला. यावेळी धक्का दिलेल्या एका कारचालकाने पलायन केले आहे. 

या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे हे करीत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!