दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । सातारा । मेढा सातारा रोड वर चिंचणी गावाजवळ झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
मेढा शहराकदून सातारा कडे निघालेली झायलो ही गाडी आणि सातारा कडून येणारी दुचाकी गाडी यांची चिंचणी आणि मोरावळे गावाच्या मधे हा भीषण अपघात झाला. यामधे दुचाकीस्वार हे बी एम पार्टे सहकारी पतसंस्था चे कर्मचारी हे संस्थेच्या कामाकरीता सातारा येथून परत येत होते. त्यामधे रघुनाथ चिकणे रा.मेढा आणि भरत शेलार रा. कालोशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर चारचाकी गाडी तील दोघेजण अत्यवस्थ अवस्थेत आहेत. सर्व अपघातग्रस्तांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल मधे उपचाराकरिता लोकांनी पाठविले.