
दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
वाठार फाटा (ता. फलटण) येथे फलटण ते सातारा रोडवर दि. २१/०२/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास एका पांढर्या रंगाच्या सुपर कॅरी वाहनातून (क्रमांक एमएच ११ डीडी २१५६) कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या गोवंश जातीच्या गाईंची सुटका गोरक्षक सौरभ सोनवले (रा. भडकमकर नगर, ता. फलटण) यांनी केली.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गाडीत असलेले अमोल भिवा जाधव, महादेव हणमंत गुजले (दोन्ही रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी एक काळ्या रंगाची जर्शी गाय तिचे अंदाचे वय वर्षे व दुसरी जर्सी गाय काळ्या व पांढ-या रंगाची तिचे अंदाचे वय४ वर्षे अशा दोन गायीस दोरीने बांधून त्यास अन्न पाणी व चारा यांची सोय केलेली नव्हती तसेच वैद्यकीय तपासणी न करता कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आले आहेत म्हणून माझी १ ) अमोल भिवा जाधव वय ३५ वर्ष २ ) महादेव हणमंत गुजले दोन्ही रा विडणी ता फलटण जि.सातारा यांचे विरूध्द फिर्याद आहे.
यावेळी आरोपींकडून एक काळ्या रंगाची ४ वर्षे वयाची जर्शी गाय (किं. २० हजार रुपये), एक काळे-पांढर्या रंगाची ४ वर्षे वयाची जर्शी गाय (किं. १५ हजार रुपये) व ४ लाख रुपयांची एक पांढर्या रंगाचे सुपर कॅरी वाहन, असा एकूण ४,३५,०००/- मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार गार्डे करत आहेत.