दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | सातारा | इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुलांसाठी आणि मुलींसाठी 100 प्रवेश क्षमतेची दोन शासकीय वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी सर्व सोई सुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
सदर वसतिगृहामध्ये मुला-मुलींचे राहण्याची, जेवणाची व शिक्षणाची सोय शासनामार्फत केली जाणार आहे. वसतिगृहे सुरु करण्यासाठी सातारा व सातारा शहरालगत शासन नियमानुसार सर्व सोयी सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलानजिक, सातारा-415 003 या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. नितीन उबाळे यांनी केले आहे.