दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी हद्दपारीचे आदेश बजावलेले असतानाही श्रीधर उर्फ भैय्या काशिनाथ थोरवडे वय 20 रा. बुधवार पेठ, कराड आणि बजरंग सुरेश माने वय 27, राहणार बुधवार पेठ, कराड हे दोघे आदेशाचे उल्लंघन करून अश्विनी बियर बार जवळ, कराड, तालुका कराड येथे 28 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आले. याबाबतची फिर्याद जयसिंग तुकाराम राजगे वय 46 यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून पोलीस हवालदार माने अधिक तपास करीत आहेत.