सातार्‍यातुन दोन दुचाकी चोरीस


 

स्थैर्य, सातारा, दि. 25 : सातारा येथील गुरुवाज परज आणि मंगळवार पेठ येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्या. 

याबाबत माहिती अशी, गुरुवार परज येथील खड्डा मस्जिदीसमोर जमीर जेहिरुद्दीन शेख यांची मोटारसायकल (एमएच 11 एझेड 9251) पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकीचे हँडल लॉक तोडून बनावट चावीने गाडी सुरू करून पळवून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार सणस तपास करत आहेत. 

दरम्यान, मंगळवार पेठेतील रोहन हाईटस्च्या पार्किंगमध्ये जमीर नाजीर मागावकर यांनी पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी हँडल लॉक तोडून व बनावट चावीचा वापर करून पळवून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून तपास हवालदार सणस करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!