सातार्‍यातून दोन दुचाकी चोरीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 8 : सातारा शहरातून पोवई नाका तसेच सातारा हॉस्पिटलसमोरून दुचाकी चोरून गेल्या आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सातारा येथील पोवई नाका परिसरातून चोरट्यांनी दुचाकी पळवून नेली. याबाबत सचिन दशरथ घोडके रा. चिंधवली, ता. वाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 4 रोजी पोवई नाका येथे मेहता सेल्युलर समोर घोडके यांनी दुचाकी पार्क केली होती. दुपारी 2 ते अडीचच्या सुमारास चोरट्यांनी दुचाकी पळवून नेली. याप्रकरणी हवालदार जगदाळे तपास करत आहेत. 

दुसर्‍या घटनेत कृष्णानगर परिसरातून दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद पोपट शंकर शिंदे यांनी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 5 रोजी त्यांची दुचाकी सातारा हॉस्पिटलसमोरील पार्किंगमध्ये पार्क केली होती. दुपारी 3.45 ते 4 सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून हवालदार मेचकर तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!