तेहतीस हजारांच्या चंदनाच्या लाकडांसह दोघांना अटक


स्थैर्य, सातारा, दि.२ : सातारा शहरातील काशीविश्वेश्वर चौकात चंदनाच्या लाकडांची विक्री करत असताना शाहूपुरी पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून सुमारे ३३ हजार किमतीचे चंदन लाकूड जप्त केले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील काशीविश्वेश्वर चौकात काहीजण चंदनाचे लाकूड विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शाहुपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि.विशाल वाईकर यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि.संदीप शितोळे व शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या चौकात सापळा लावला होता. दिनांक 31 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन इसम पोत्यांमध्ये लाकडे घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुमारे 60 किलो वजनाची चंदनाची लाकडे गाभ्यासहित मिळून आली. यावेळी पोलिसांनी संदीप कालिदास महाडिक (वय 55 रा. यादव गोपाळ पेठ सातारा व शंकर भिवा चंदनवाले रा. शेंद्रे ता. जि. सातारा यांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. विशाल वाईकर सपोनि. संदीप शितोळे,पो.हेड.कॉ. हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने,स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, यांनी सहभाग घेतला होता. याबाबत अधिक तपास सपोनि शितोळे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!