दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा शहर पोलीस ठाण्यात आणि मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शहर पोलिसांनी प्रथमेश तानाजी जाधव वय 21, रा. पालवी चौक, गोडोली तर मेढा पोलिसांनी दीपक भगवान कुंभार वय 27, रा. कुंभारआळी, शिवाजीनगर याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 16 वर्ष 7 महिन्याच्या युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च 2022 ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत त्या युवतीचा मित्र प्रथमेश जाधव याने लग्नाचे अमिष दाखवून घरी बोलवून घेवून इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यात ती युवती गर्भवती राहिली. त्यावरुन त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. याचा तपास याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे या करत आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात 15 वर्ष 6 महिने वयाच्या युवतीने मेढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन दीपक भगवान कुंभार याने नोव्हेंबर 2021 ते एपिल 2022 च्या दरम्यान इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट काढून तिच्याशी ओळख वाढवली. जबरदस्तीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. तिचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल करण्यची धमकी देवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक कुंभार याला अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.के. माने हे करत आहेत.