स्थैर्य, सातारा, दि. 15 : देगाव, ता. सातारा येथील एका ओढ्यात अज्ञात इसमाचा डोक्यात दगड घालून निर्घृन खुन करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी वर्णे व लिंब येथून संशयितांना अटक केली आहे. गणेश सोमाराम मुर्म वय 30 रा. भोसले वस्ती शिवराज पेट्रोलपंपामागे सातारा मुळ रा. राजाविटा जि. गिरडी राज्य (झारखंड) आणि राजेश बुधान टुडु 25 रा. एमआयडीसी, सातारा मुळ रा. खैराघाट जि. गिरडी (झारखंड) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत देगाव येथील एका ओढ्यात निर्घुण केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. मृताची कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्याने ओळख पटविणे व तपास करणे घेणे किचकट झाले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक सो व मा.सहा.अधिक्षक समीर शेख सो यांनी पोलीस निरीक्षक आण्णा मांजरे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. दरम्यान आज (दि. 15) पोनि आण्णासाहेब मांजरे यांना खुनप्रकरणातील संशयीत वर्णे, ता. सातारा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उपनिरीक्षक एन.एस.कदम, पो. उपनिरीक्षक ए. एस. पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना देवून वर्णे याठिकाणी पाठवले. पथकाने वर्णे येथून एका संशयीतास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने व मित्र राजेश याने या खुनाची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुसरा संशयीतास लिंब, ता. सातारा येथून ताब्यात घेतले.
दोन्ही संशयीतांना पोलीस ठाणयात असून तपास केला असता त्यांनी हा गुन्हा त्यांनी कबुल केले. यानंतर आरोपींना पुढील तपासकामी सातारा तालुका पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील व सहा.पो. अधीक्षक समीर शेख यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, उपनिरीक्षक ए. एस. पाटील, हवालदार प्रशांत शेवाळे, पो. ना. शिवाजी भिसे, पो. ना. अविनाश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, किशोर तारळकर यांनी सहभाग घेतला.