दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । वाई । हनीट्रॅप च्या जाळ्यात अडकवून बदनामीची भीती दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह दोघांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका पतसंस्थेत शिपाई पदावर काम करणाऱ्या जितेंद्र सोपान जाधव वय (वय ३० रा. बोपेगाव,ता वाई) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे .त्यांच्या कार्यालयात एका महिलेने मला नोकरीची गरज आहे येथे नोकरी मिळणार मिळेल काय असे सांगून जाधव यांचा त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला यानंतर त्याच्यावर अश्लील मेसेज पाठवून त्यांना एका हॉटेलात भेटायला बोलाविले. यानंतर या महिलेच्या पतीने माझ्या पत्नीला अश्लील मेसेज का पाठवले असे सांगून दमदाटी करून बदनामी ची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन लाख ८९ हजार५०० रुपये उकळले. यानंतर पुन्हा बदनामीची व ठार मारण्याची धमकी देऊन पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. यानंतर जाधव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी पुनम हेमंत मोरे व हेमंत विजय मोरे (मूळ गाव ओझर्डे ता वाई हल्ली रा कुडाळ तालुका जावली) यांना अटक केली आहे. या दोघांनी आणखी काही जणांना जाळ्यात अडकवून फसवले असून त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र या दोघां व्यतिरिक्त त्यांनी अनेकांना फसविले आहे. त्यांनी वाईट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाई बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तेलतुंबडे,व विजय शिर्के,सोनाली माने,किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.