स्थैर्य, सातारा, दि. १२: सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेने रेमडीसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. प्रशांत दिनकर सावंत, वय २९, सपना प्रशांत सावंत वय २५ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचेकडून सिप्ला कंपनीचे दोन रेमडिसिवीर इंजेक्शन व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा ३१,००० / – रु . किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी, कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडीसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार चालत असल्याच्या घटना राज्यात निदर्शनास आल्या।आहेत. त्यावर लक्ष ठेवून गुप्त माहिती काढून तातडीने कारवाई करण्याबाबतच्या सुचना मा.पोलीस अधीक्षक श्री.अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाला दिलेल्या आहेत. यासंबंधाने जिल्हा विशेष शाखेस प्राप्त असलेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने जिल्हा विशेष शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते.
दिनांक १०/०५/२०२१ रोजी समर्थ मंदीर चौक परिसरात त्यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून शंकरपार्वती गिरण घाणेकर चौक याठिकाणी चैतन्य किराणा दुकानासमोर प्रशांत दिनकर सावंत वय -२९ आणि सपना प्रशांत सावंत वय – २५ दोन्ही रा. पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदीर, पन्हाळे निवास मंगळवार पेठ , सातारा हे दोघे रात्री 8.३० वा.चे सुमारास बेकायदेशीर रित्या , विनापरवाना व मुळ विक्री पेक्षा अधिक किंमतीला विक्रीसाठी रेमडीसिवीर इंजेक्शन घेऊन जाताना मिळून आले. त्यानंतर श्री.अरूण गोडसे , सहाय्यक आयुक्त , अन्न व औषध प्रशासन ल, सातारा यांना बोलावून पुढील कार्यवाही करण्यात आली. याबाबत त्यांचे फिर्यादीवरून शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्री.शितोळे हे करीत आहेत .
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री अजय बंसल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री धिरज पाटील , मा . सहा.पोलीस अधीक्षक आंचल दलाल , पोनि विजय कुंभार जिल्हा विशेष शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेकडील सपोनि श्री.प्रताप भोसले , पोना सागर भोसले , पोना . जयवंत खांडके , मपोना अश्विनी बनसोडे , मपोकॉ तेजल कदम , पोकॉ . सुमित मोरे , पो.कॉ. निलेश बच्छाव , पो.काँ . अनिकेत अहिवळे , पोकॉ . राहुल वायदंडे सहभागी झाले होते.