दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । सातारा । ठोसेघर तालुका सातारा येथे पिसोरी हरणाच्या शिकारप्रकरणी सातारा बंद विभागाने ठोसेघर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे बाबुराव रामचंद्र जाधव राहणार ठोसेघर वय 50 रघुनाथ विठ्ठल चव्हाण वय 49 या दोघांना दोन मे दोन हजार बावीस पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
पिसोरी जातीच्या हरणाच्या शिकारप्रकरणी या दोघांवर ठपका ठेवण्यात आला आहे . या प्रकरणाची अधिक माहिती अशी बाबुराव जाधव व चव्हाण (रा ठोसेघर ) यांनी पिसोरी हरणाची शिकार करून त्याचे मांस शिजवण्याची माहिती सातारा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांना मिळाली होती या माहितीवरून सातारा वन विभागाच्या पथकाने ठोसेघर येथे चव्हाण यांच्या निवासस्थानी छापा मारला असता पिसोरी हरणाचे शिजवलेले मांस जर्मन पातेल्यात दिसून आले.
पंचांसमक्ष हे मांस वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले वन्य प्राण्यांचे मांस अनधिकृतपणे बाळगणे, शिकार करणे, राखीव वनात विनापरवाना प्रवेश करणे, यासाठी वन्यजीव व संरक्षण अधिनियम 72 कलम 9 प्रमाणे संबंधितांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे पिशोरी हरीण वन्यजीव सूची नुसार माऊस डियर प्रवर्गामध्ये अनुसूची 1 विशेष भाग 1 मधील दुर्मिळ वन्यजीव आहे.
या दोघांना वनविभागाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन मे 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे याप्रकरणी जर गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा कायद्यामध्ये तरतूद आहे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने अंतर्गत अरुण सोळंकी वनपाल अशोक मला राजकुमार मोसल की साधना राठोड महेश सोनवले श्रीकांत दुर्गे अश्विनी नरळे गोरख शिरतोडे इत्यादींनी कारवाई मध्ये भाग घेतला होता.