चितळीच्या शेतकर्‍यांना 12 लाखाचा गंडा घालणारे दोन मुकादम जेरबंद


दैनिक स्थैर्य । 25 जुलै 2025 । सातारा । चितळी, ता. खटाव येथील शेतकर्‍यांना गंडा घालणार्‍या दोन ऊस टोळी मुकादमांना वडूज पोलीसांनी जेरबंद केले. याप्रकरणी चितळी, ता. खटाव गावचे शेतकरी गणपत भगवान पवार व धर्मराज आबासो पवार यांनी फिर्याद दिली होती.

आरोपी मच्छिंद्र शिवदास माने रा. भूम, ता. भूम, जि. धाराशिव व सचिन भानुदास जाधव रा कोळेगांव ता माळशिरस जि सोलापूर यांनी सन 2023 मध्ये आम्ही तुम्हाला ऊस तोडणीसाठी 12 कोयते असे 24 ऊस तोडणी मजूर कोयत्यांची 1 टोळी देतो असे सांगून तसेच तुम्हाला आणखी ऊसतोड कामगार पुरवितो असे आमिष दाखवून त्यांचेकडून रोख रक्कम व बँक आरटीजी द्वारे एकूण 12,70,000/- रूपये घेवून शेतकर्‍यांना ऊसतोड मजूर न पुरविता तसेच त्यांचेकडून घेतलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केलेबाबत वडूज पोलीस ठाणे येथे दि. 5 नोव्हे. 24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा राहणेचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता. सदर दोन्ही आरोपी हे सतत मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस होत नव्हते.


Back to top button
Don`t copy text!