दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी फलटण तालुक्यातील 20 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत.
कोळकी, तरडगाव, आरडगाव, राजुरी, साखरवाडी, कापडगाव, निंबळक, सांगवी, पाडेगाव, कुसुर, फरांदवाडी, राजाळे, ताथवडा, गिरवी, तावडी, कोरेगाव, दुधेबावी, जाधववाडी ही गावे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कटेंटमेंट झोन प्रमाणे नियम लागू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.