लसीकरणानंतर आतापर्यंत 27 जणांचा झाला मृत्यू, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण – ‘या मृत्यूंचा लसीकरणाशी संबंध नाही’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१४: देशात कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर जीव गमावणाऱ्यांचा आकडा 27 पर्यंत गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांच्या आत 3 लोकांच्या मृत्यू झाला आहे. या लोकांनी 8 ते 9 दिवसांपूर्वी लस घेतली होती. मंत्रालयाने हे देखील सांगितले आहे की, आतापर्यंत जीव गमावणाऱ्या 25 लोकांच्या मृत्यूचे कारण हे वेगवेगळे आहे. त्यांना इतर आजार होते. लसीचा मृत्यूशी काहीच संबंध नाही. तर दोन लोकांचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी आहे.

11 लोकांनी रुग्णालयात सोडले प्राण
मंत्रालयानुसार व्हॅक्सीन घेतल्यानंतर 11 लोकांनी रुग्णालयात जीव सोडला. तर 16 जणांचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला आहे. गेल्या 24 तासांच्या आत ज्या लोकांचा जीव गेला आहे त्यामध्ये एकाचे वय 35, दुसऱ्याचे 38 आणि तिसऱ्याचे 58 वर्षे होते. हे मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा येथील रहिवासी होते.

आतापर्यंत 34 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणानंतर तात्काळ आतापर्यंत 34 लोकांना साइड इफेक्टमुळे रुग्णालयात दाखल केले. यामध्ये 27 लोक बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत. 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नव्या प्रकरणांपेक्षा कमी रुग्ण झाले बरे
देशात शनिवारी रात्री उशीरापर्यंत 12 हजार 188 संक्रमित आढळले. 11 हजार 79 बरे झाले आणि 88 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1.09 कोटी लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. यामध्ये 1.06 कोटी बरे झाले आहेत. तर 1.55 लाख जणांनी जीव गमावला आहे. तर 1.34 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!