गुरसाळेच्या 75 वर्षीय वृद्धाचा मृत्युपश्चातचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
स्थैर्य, सातारा, दि. 5 : सातारा जिल्ह्यातील वीस जणांचे अहवाल कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करून आलेल्या गुरसाळे गावठाण, ता. खटाव येथील 75 वर्षीय वृद्धाचा घरीच मृत्यू झाला होता. या वृद्धाचा मृत्युपश्चात अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष अशा दोन जणांचा रिपोर्ट कोरोना (कोविड 19) बाधित आहेत तसेच 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.
6 जण कोरोनामुक्त
दरम्यान, कोविड केअर केंद्र, खावली, ता. सातारा येथील 2 व कोविड केअर केंद्र, रायगाव, ता. जावली येथील 4 असे एकूण 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 68, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 15, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 93, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 असे एकूण 215 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्ण
बाधित रुग्णांमध्ये खटाव तालुक्यातील साठेवाडी येथील 76 वर्षीय महिला, गुरसाळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष (मृत), खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी, धनगरवाडी येथील 50 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील समर्थनगर, सातारा येथील 19 वर्षीय युवक, करंडी येथील 25 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवती, वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील जोरगाव येथील 25 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक व 12 वर्षांचा मुलगा, कोळकी येथील 25 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कावडी येथील 15 वर्षाचा मुलगा, 58 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, माण तालुक्यातील वडजल येथील 55 वर्षीय पुरुष,
एन.सी.सी.एस. पुणे यांनी 175 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.