
दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । कोळकी । कोळकी गावामधील रहिवासी असलेले सचिन पाटोळे यांची कन्या समृद्धी सचिन पाटोळे हिला किडणी स्टोन झालेला आहे. त्या बाबतचे वैद्यकीय अहवाल नुकतेच समोर आलेले आहेत. सचिन पाटोळे यांची परिस्थिती हि अत्यंत हलाखीची आहे. त्यांना त्यांच्या मुलीचे किडणी स्टोनचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. तरी याबाबत दानशूरांनी सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन युवा उद्योजक धर्मराज देशपांडे यांनी केलेले आहे. सदरील चिमुकलीला मदत करण्यासाठी पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. > धर्मराज देशपांडे – 9960318802 > सचिन पाटोळे – 7709821582