दैनिक स्थैर्य | दि. 07 सप्टेंबर 2023 | फलटण | कराड अर्बन बँक कायमच पर्यावरण पूरक विचार करीत आला आहे. यासोबतच बँकेच्या सर्व शाखांमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा होईल; याचा विचार बँक करीत आली आहे. आताच्या घडीला ज्या प्रवासाला खर्च होत आहे; यामध्ये खर्च कसा कमी करता येईल म्हणूनच कराड बँकेच्या वतीने सर्व शाखांना इलेक्ट्रिक गाडी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मत कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी व्यक्त केले.
येथील टीव्हीएस कंपनीच्या अधिकृत विक्रते असलेल्या अरिहंत ऑटोमोबाईल मध्ये नव्याने दाखल झालेल्या आयक्युब या इलेक्ट्रिक गाडीचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी फलटण येथील अरिहंत टिव्हीएसच्या शोरूममध्ये आयोजित कार्यक्रमात आयक्युब गाडीचे वितरण संपन्न झाले. यावेळी आयक्युब या गाडीची सविस्तर माहिती अरीहंत टिव्हीएसचे सर्वेसर्वा सिद्धांत मंगेश दोषी यांनी दिली. यावेळी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, कराड अर्बन बँकेच्या बझारच्या व्हाईस चेअरमन सौ. गुरव, फलटण येथील प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी नितीन गांधी (काका), प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणधीर भोईटे, मनुभाई पटेल, जावेद तांबोळी, प्रसन्न कुलकर्णी, प्रा. शिवलाल गावडे, रविकांत इंगवले, डॉ. ऋषिकेश राजवैद्य, हितेन शहा, प्रशांत दोषी, कराड अर्बन बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक संजय पोरे, फलटण शाखेचे व्यवस्थापक संदीप भोसले, राजीव शहा यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
काही दिवसांच्यापूर्वी फलटण येथे टीव्हीएस आयक्युब या गाडीचे लौंचिंग करण्यात आले होते. त्यानंतर कराड अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आयक्युब गाडीची ऑर्डर अरिहंत टीव्हीएसला देण्यात आली होती. एकूण 51 गाड्यांची ऑर्डर अरिहंत टीव्हीएसला कराड अर्बन बँकेच्या वतीने देण्यात आली; याबद्दल बँकेचे आभार मंगेश दोषी यांनी मानले.
यावेळी अरिहंत ऑटोमोबाईल्सचे संचालक सिद्धांत दोषी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले.